Hi! Welcome...

आम्ही वाचकांसाठी इंटरनेटवर मराठीचे प्रयत्नपुर्वक प्रतिनिधीत्व करणार्‍या संकेतस्थळांची यादी घेऊन आलो आहोत. याला आपण एक छोटेखानी वेब डीरेक्टरीच म्हणुयात. सध्याजरी या यादीतील संकेतस्थळांची संख्या १२२ इतकीच असली तरी मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ही यादी हजारो माहितीपुर्ण मराठी संकेतस्थळांनी सजलेली असेल.
स्वरुपात उपलब्ध असून लवकरच विषयवार मांडणी करुन ही यादी पुनर्प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. नेटभेटची ही वेब डिरेक्टरी अधिक प्रगल्भ आणि उपयुक्त होण्यास मदत व्हावी यासाठी वाचकांच्या प्रतीक्रीया आणि अभिप्रायांची आम्हांस अत्यंत गरज आहे. ही वेब यादी आपल्याला नक्की आवडेल याची आम्हांला खात्री आहे.

विवेक काजरेकर



लोकसंवाद


लोकसंवाद दिवाळी अंकातील साहित्य वाचनीय, चिंतनीय आणि मनोरंजकबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱया लेखांचा अंकात ऊहापोह केला जातो. कुठलाही एक वैचारिक, तात्विक विषय घेऊन परिसंवाद आयोजित केले जातात. त्यामध्ये प्रथितयश साहित्यिकांच्या चिंतनशील लिखाणाने दिवाळी अंक तेजोमय होतो. अनेक नवोदितांचे लेखही अंकाला सौंदर्याचा बहर आणतात. दरवर्षी लोकसंवादचा दिवाळी अंक व त्रैमासिक वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला असतो. निरनिराळे विषय वाचकांना उपलब्ध करुन दिल्यामुळे व साहित्याचा दर्जा उत्तम असल्यामुळे लोकसंवादचे अल्पावधीतच महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरही प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले आहे.


http://www.loksanwad.com/

महर्षी विनोद - जीवन व कार्य


वाचकाच्या हृदयात प्रवेश करून, त्याचे अख्खे आयुष्य बदलून, ते नवीन उन्नत उदात्त बनविण्याची किमया करणारे स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व


http://maharshivinod.org/